विजांच्या कडकडाटासह… जळगाव सह “या” आठ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सतत बदल होत असताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकाडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली हवामान विभागाने आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात मोठी चढउतार पाहायला मिळत असून ऐन फेब्रुवारी महिन्यात पाऊस होत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती आहे
जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी आहे.
त्यामध्येच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तरेकडे थंडी वाढली की, राज्यातही थंडीची लाट येते.
राज्यात सध्याच्या परिस्थितीला उकाडा चांगलाच वाढल्याचे बघायला मिळत आहे. पावसाला पोषक वातावरणही निर्माण झाले. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा मोठा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली
आहे.

