भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

मध्यप्रदेशातील चार दरोडेखोरांना अटक, एक फरार, यावल पोलिसांची कारवाई

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | बऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गावर यावल-चोपडा रस्त्यावर एका विना क्रमांकाची अर्टिगा कारमध्ये दरोडा टाकण्याच्या उद्देशातून पाच संशयित थांबलेले असल्याची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तातडीने चार जणांना ताब्यात घेतले तर एक संशयीत पसार झाला असून पोलिसांनी वाहन व दरोडा टाकण्यासाठी त्यांच्याकडे असलेले साहित्य हस्तगत केले. त्यांच्या हातात हत्यार व तोंडावर काळ्या रंगाचा मास्क लावलेला होते. हे सर्व जण मध्यप्रदेशातील असून या प्रकरणी यावल पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवार रोजी मध्यरात्री नंतर अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर यावल – चोपडा रस्त्यावर किनगाव या गावाकडून यावल कडे एक संशयित वाहन येत असल्याची माहिती यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली होती. त्यांनी लागलीच सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस हवालदार सुनील पाटील, वसीम तडवी, अनिल साळुंखे, सचिन पाटील, मंगेश पाटील, ज्ञानेश्वर सपकाळे यांचे पथक तयार करून या पथकास पडताळणी करीत पाठवले.

पथक मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चोपडा रस्त्यावर गेले असता विरावली फाट्याच्या पुढे अंधारात विना क्रमांकाची अर्टिगा कार रस्त्याच्या कोपर्‍यात लावलेली त्यांना दिसली. तर एक जण रस्त्यावर पाळत ठेवुन असल्याचे दिसुन आले. पोलिस कारच्या दिशेने जात असतांना कार पळवण्याचा प्रयत्न चालकाने केला तर पाळत ठेवणारा पोलिस दिसतच अंधाराचा फायदा घेत पसार झाला.

पोलिसांनी कार मध्ये तोंडावर काळ्या रंगाचा मास्क लावलेल्या संशयित सोहेल मकसूद खान (वय २७, रा.खजराना इंदोर, मध्यप्रदेश), परवेज अब्दुल गनी (वय ३५, रा.चंदन नगर इंदोर, मध्य प्रदेश), इमरान अली शहजाद अली शाह (वय ३६, रा.खजराना इंदोर, मध्यप्रदेश) व मोहम्मद वसीम मोहम्मद रशीद (वय ३४, रा.सरवटे रोड, इंदोर मध्य प्रदेश) यांना अटक करून त्यांच्या जवळून हत्यारे जप्त केली. या चौघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक अनिल महाजन हे पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!