भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यभुसावळसामाजिक

वराडसीम गावात महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर………

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज| महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ व झुंजार लेवा ग्रुप वराडसीम यांच्या वतीने दि 3 सप्टेंबर 2025 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 369 लोकांनी आरोग्य तपासणी चा लाभ घेतला. त्याच बरोबर गरजू रुग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात आली शिबिरामध्ये रक्तदाब बीपी डायबिटीस शुगर कार्डिओग्राम एसीजी ची तपासणी सुद्धा मोफत करण्यात आली. आरोग्य शिबिरासाठी श्री हृदयम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल व नेत्रम हॉस्पिटल भुसावळ येथील प्रसिद्ध डॉ मेश्राम, डॉ मनिष रगडे यांनी रुग्णांची तपासणी करून रुग्णांना मार्गदर्शन केले.

शिबिराच्या सुरुवातीला नेत्ररोग तज्ञ डॉ मेश्राम यांच्या हस्ते मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले व नंतर आलेल्या सर्व मान्यवर डॉक्टर यांचे महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ वराडसिम गावकरी यांच्या वतीने स्वागत करण्यात आले व आरोग्य तपासणी सुरु करण्यात आली
मोफत आरोग्य शिबिरासाठी महासंघाचे खान्देश विभाग संघटक श्री विनीत पाटील (हबर्डिकर) महासंघाचे पदाधिकारी धीरज बऱ्हाटे महासंघाचे वरडशिम गाव प्रमुख पराग भारंबे, अनिकेत ढाके, सागर काळे, त्रृषल खाचणे, ज्ञानराज काळे,दीपक वाणी, गौरव पाचपांडे,जयेश भारंबे, झुंजार लेवा ग्रुप व महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ वराडसिम चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!