भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

गांजा तस्कराला अटक, गांजाचा मोठा साठा जप्त

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गांजाची तस्करी करणाऱ्या तस्कराला तस्करी करीत असताना रंगेहात अटक करून त्याच्या जवळून तब्बल साडे पाच किलो गांजा जप्त करण्यात आला असून ही कारवाई जळगाव शहरातील मेहरुण तलावाच्या परिसरात जळगाव एम आय डी सी पोलिसांनी केली.

मेहरुण तलाव परिसरातील जे.के. पार्क भागातील उद्यानात एक व्यक्ती गांजाची वाहतूक करत तस्करी करीत असल्याची माहिती पोलिसाना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी उद्यानात पाहणी केली असता, एक व्यक्ती मोटारसायकलवर गांजा घेऊन उभा असल्याचे त्यांना दिसून आले. पोलिसांनी मुकेश विष्णू अभंगे (वय ४२, रा. कंजरवाडा, जळगाव) यातएकही चौकशी करून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एका मोठ्या पिशवीत साडेपाच किलो गांजा आढळून आला. गांजा जप्त करून पोलिसांनी मुकेश विष्णू अभंगे याला ताब्यात घेऊन घटनास्थळी फॉरेन्सिक विभागाला बोलावून नमुने तपासले. पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत ४० ते ५० हजार रुपये असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील चौकशी पोलिस करीत आहेत .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!