Garbardi Dam : सुकी नदीवरील गारबर्डी धरणावर नऊ ते दहा पर्यटक अडकले !
रावेर/सावदा, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : येथून जवळच असलेल्या सातपुडा पर्वत रांगेतील सुकी नदीवर असलेले गारबर्डी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. धरणावर पर्यटनासाठी गेलेले आठ ते दहा जण धबधब्याजवळील परिसरात अडकून पडले आहेत. या सर्वांना वाचवण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न चालू आहे.
सावदा शहरापासून जवळ असणाऱ्या सुकी गारबडी धरणामध्ये संध्याकाळी धबधब्याजवळ पर्यटनाचा व निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी दहा जण गेले होते अचानक पावसाचा जोर वाढल्यामुळे चारही बाजूने पाण्याचा प्रवाह वाढायला लागला त्यामुळे हे सर्व आठ ते दहा पर्यटक पुराच्या पाण्याने वेडले गेले त्यामुळे त्यांनी बचाव करण्यास कार्यासाठी आरडाओरडा सुरू केली जवळच असणाऱ्या गावातील काही नागरिकांना हे आवाज आल्यावर त्यांनी तातडीने प्रशासनाला कळविले त्यानुसार तालुक्याचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी घटनास्थळी गाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली आहे स्थानिक पट्टीचे पोहणारे आणि इतर यंत्रणेची त्यांनी मदत घेतली आहे
त्याचबरोबर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी धुळे येथून देखील बचाव पथक घटनास्थळी पाठवले आहे पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता हे देखील घटनास्थळी असून बचाव कार्य सुरू आहे दरम्यान हे पर्यटक कोण व कुठून आले याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. याबाबत प्रयत्न सुरू आहेत नागरिकांनी कुठल्याही नदी धरण तलाव या ठिकाणी किनाऱ्यावर जाऊ नये तसेच पाण्यात उतरू नये सर्वत्र पावसाच्या पाण्याने धोक्याचे पातळी गाठली आहे जाणे धोक्याचे आहे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.