भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनंदुरबारमहाराष्ट्रशैक्षणिक

अवघ्या काही मिनिटांत “येथे” मिळतात जातीचे हूबेहुब बोगस प्रमाणपत्र,जात वैधता प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले..

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सध्या शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्या सह उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिलियर, डोमासाईल, यासोबत जात वैधता प्रमाणपत्र आदी दाखल्यांसाठी धावपळ करावी लागत आहेत. कमी वेळेत दाखले तयार करून घेण्यासाठी सर्वच पालक आणि विद्यार्थी हे धडपड करत आहेत. याच गोष्टीचा फायदा घेत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव अक्कलकुवा आणि तळोदा या तालुक्यांमध्ये काही सायबर कॅफे चालक विद्यार्थी पालकांकडून ५०० रुपयांमध्ये अवघ्या ५ मिनिटात जातीचे दाखले तयार करून देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

अनेक ठग सायबर कॅफेच्या नावाखाली हे असले गोरखधंदे करून आपले दुकान चालवत असल्याचं समोर आल आहे. विद्यार्थी आणि पालकांना कमी वेळेत दाखले मिळून देण्याचं आमिष दाखवत कॉम्पुटरवर अवघ्या काही मिनिटातच बोगस हुबेहूब प्रमाणपत्र तयार करून देत आहेत. विद्यार्थ्यांच्या जुन्या प्रमाणपत्रावरच नाव आणि इतर माहिती बदल करून हे प्रमाणपत्र तयार केले जात असल्याची बाब समोर आली आहे. सायबर चालकांसोबत ग्रामपंचायतीत असलेले काही ऑपरेटर देखील बोगस प्रमाणपत्र तयार करत असल्याची माहिती मिळत आहे.

जातीच्या प्रमाणपत्र सोबत उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिलियर, डोमासाईल, यासोबत जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे अनेक लहान-मोठे दाखले सोबत अनेक प्रकारचे दाखले देखील बोगस पद्धतीने तयार केले जात आहेत. मात्र हे प्रमाणपत्र ज्यावेळेस स्कॅनरने तपासले जातात, त्यावेळी हे प्रमाणपत्र बोगस असल्याच समोर येत आहे.

विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ खेळून शैक्षणिक नुकसान होत असून हे बोगस प्रमाणपत्रांचे प्रकरण समोर आल्यानंतर याबाबत शहादा प्रांत अधिकारी सुभाष दळवी यांना ज्यावेळी माहिती देण्यात आली त्यांनी तात्काळ गोष्टी गांभीर्याने घेत, जिल्ह्यातील तहसीलदारांना बोगस प्रमाणपत्र तयार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची सूचना दिली. मात्र या बोगस प्रमाणपत्र तयार करणाऱ्यांवर अद्याप कोणतेही गुन्हे दाखल करण्यात आलेले नाही. या बद्दल आच्चर्य व्यक्त केले जात असून गुन्हा दखल करणार की नावापुरती कारवाई केली जाणार? का कारवाईच करणार नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!