सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी : महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यातील महायुती सरकारने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४६ वरुन ५० टक्के करण्यात आला आहे.
१ जानेवारी व १ जुलै अशी वर्षातून दोन वेळा सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाते.त्यानुसार सरकारने आज बुधवार रोजी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ जुलै पासून ४ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. शासनाच्या आदेशानुसार, ही वाढ १ जानेवारी ते ३० जून २०२४ या कालावधीतील थकबाकीसह जुलै २०२४ च्या वेतना बरोबर रोखीने दिली दिली जाणार आहे. या निर्णयाचा लाभ शासकीय, निमशासकीयसह जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनाही होणार आहे.