प्रभाग रचना तातडीने सुरू करण्याचे सरकारला आदेश
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यांत घेण्याचे आदेश राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोग या निवडणुका घेण्यासाठी महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश आयोगाने राज्य सरकारला बुधवारी दिले.
ओबीसी आरक्षणासंदर्भात बांठिया आयोगाच्या पूर्वीची स्थिती असणार आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये ओबीसींचे पूर्ण आरक्षण लागू असणार आहे. प्रभाग, गट आणि गणांची रचना झाल्यानंतर आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे आता खर्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार असून, राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे
तसेच, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची रचना करण्याचे आदेशही दिले आहेत. त्या नुसार राज्य सरकारला पालिकांची प्रभाग रचना, तसेच गट आणि गणांची फेररचना करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे.
गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत.
सुरुवातीला कोरोनाचे संकट, रखडलेली प्रभाग रचना आणि नंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबलेल्या आहेत.
त्यात २९ महानगरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषदा आणि २८९ पंचायत समित्यांवर प्रशासक बसले आहेत.
अशातच सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला आदेश देत पुढील चार आठवड्यांत निवडणुका घोषित करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, पूर्ण प्रक्रिया चार महिन्यांत संपवावी, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यावर राज्य निवडणूक आयोगाने कार्यवाही सुरू केली आहे. आयोगाने राज्य सरकारला पत्र पाठवून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासाठी महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींची प्रभाग रचना करण्याचे आदेश बुधवारी जारी केले. तसेच, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचीही गट आणि गण यांची रचना करण्यास सांगितले आहे.
राज्यात एकूण २९ महानगरपालिका, जिल्हा परिषदा ३२, ३३६ पंचायत समित्या, २४८ नगर परिषदावर व ४२ नगरपंचायतींवर प्रशासक आहेत. प्रशासक असलेल्या एकूण नगर परिषदा व नगर पंचायती (२४८हा४२) =२९०
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा