कर्जाचा पहिला हप्ता दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांसाठी? जागतिक स्तरावर संताप
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पाकिस्तान दहशतवाद्यांना समर्थन देत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात IMF कडून मिळालेला पहिला हप्ता 1 अब्ज डॉलरच्या कर्जाचा वापर पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या कुटुंबांना भरपाई देण्यासाठी केला आहे. दहशतवादी आणि जैश-ए- मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरच्या १४ कुटुंबीयांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानने त्याला १४ कोटी रुपयांची भरपाई देण्याची शक्यता वर्तवली आहे.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबांना पाकिस्तानने १० लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केलीय आहे. यात जिहादी दहशतवाद्यांना शहीद म्हणून सन्मान देण्यात येणार आहे.
पाकिस्तानने पुन्हा एकदा दहशतवादाला समर्थन देत जागतिक समुदायाला धक्का दिला आहे. पाकिस्तानच्या या कृत्याचा जगात संताप व्यक्त केला जात आहे.
पाकिस्तान कित्येक वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. कर्जबाजारी पाकिस्तान सातत्यानं आपला पदर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात IMF समोर पसरत आला.
IMF कडे पाकनं पुन्हा मदतीची याचना केली होती. धोका ओळखून भारतानं पाकिस्तानला मदत करू नये अशी भूमिका मांडली. मात्र, तरीही भारताचा विरोध डावलून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं ८ हजार ५०० कोटी रूपयांचा निधी पाकिस्तानला दिले.
सर्वात मोठी धक्कादायक माहिती अशी की, दहशतवादी आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझर याआला UN ने दहशतवादी घोषित केले आहे. आणि या UN घोषित दहशतवादी आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरच्या १४ कुटुंबीयांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानने त्याला १४ कोटी रुपयांची भरपाई देण्याची शक्यता वर्तवली आहे.
काश्मीरातल्या पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकला जोरदार प्रत्युत्तर देत दहशतवादी तळ पूर्णपणे नष्ट करण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्यात पाकच्या हवाई तळांना नष्ट करण्यात आले.
दरम्यान, सन २०२३ मध्येही पाकलाbआंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने ,७.५ अब्ज डॉलर्सची मदत केली होती. त्यातून अर्थव्यवस्था सावरल्याचा पाकिस्ताननं सांगितलं. त्यामुळे पुन्हा कर्ज मागताच ते पाकला दिलं गेलं. मात्र सीमापार दहशतवादाला केलेली ही मदत होईल तसंच यातून जागतिक मूल्यांची थट्टा केली गेली, असं म्हणत भारतानं आपला निषेध नोंदवला. या पैशांचा विनियोग पाकनं योग्य कार्यासाठी दाखवला तरी त्या आडून दहशतवादी कारवाया वाढतील अशी भीती भारतानं व्यक्त केली होती. शेवटी तेच घडलं आहे. पाकने कर्जाच्या पैशातून जिहाद कुटुंबीयांना १० कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
