महिला ग्रा.प.सदस्याच्या पती कडून पन्नास हजाराचा पहिला हप्ता लाच घेणारा ग्रामसेवक गजाआड
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पत्नी ग्रामपंचायत सदस्य असलेल्या पती कडून ५० हजार रुपये लाच घेताना ग्रामसेवकाला लाच लुचपत विभागाच्या पथकाने अटक अटक केली,
यातील तक्रारदार यांची पत्नी ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत. तक्रारदार व त्यांची पत्नी यांनी ग्रामसेवक मेघशाम रोहिदास बोरसे, यांची भेट घेऊन त्यांची पत्नी सदस्य असलेल्या वार्डातील विकास कामांना मंजुरी मिळणे करिता अर्ज देऊन त्यांना विनंती केली असता ग्रामसेवक बोरसे यांनी सदर कामाचे अंदाजपत्रकेत १२.००,०००/- रुपये किमतीच्या २० टक्क्याप्रमाणे २,४०,००० रुपये काम घेणाऱ्या इच्छुक ठेकेदाराकडून आगाऊ कमिशन घेऊन द्यावे लागतील असे सांगितल्याने तक्रारदार यांनी दि ४/३/२०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात समक्ष येऊन तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची दि. ७/३ २०२४ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान बोरसे यांनी तक्रारदार यांचे कडे तडजोडी अंती २,००,००० रुपये लाचेची मागणी करून सदर रक्कमेपैकी ५०,००० रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे मान्य केले होते. दि. २५/४/२०२४ रोज गुरुवार रोजी सापळा आयोजित केला असता बोरसे यांनी तक्रारदार यांचे कडे २,००,००० रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता ५०,००० रुपये मजदी ग्रामपंचायत कार्यालयात स्वतः पंचांसमक्ष स्वीकारताना मेघशाम रोहिदास बोरसे, वय – ४५ वर्ष, ग्रामसेवक म्हसदी, ता. साक्री, जि. धुळे ( वर्ग ३), रा. प्लॉट नं. २१, प्लॉट न २१/अ, श्रीगुरु कॉलनी, गोंदूर रोड, एस आर पाटील शाळेच्या मागे, वलवाडी, देवपूर धुळे. याना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध साक्री पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई, सापळा पर्यवेक्षण अधिकारी,अभिषेक पाटील, पोलीस उपअधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे. सापळा व तपासी अधिकारी, रूपाली खांडवी.पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे. याच्या पथकाने केली.