भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

मोठी कारवाई : ७८ कोटींचे ५२ किलो ड्रग जप्त, मास्टरमाइंड सह तिघे ताब्यात

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l राज्यात एक मोठी कारवाई समोर आली आहे.यात ५२ किलो वजनाचे ७८ कोटी रुपये किमतीचे ड्रग पकडण्यात आले आहे. नागपूरच्या पाचपावली परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ५२ किलो वजनाचे MD ड्रग जप्त करण्यात आले आहे.या ड्रग ची किंमत ७८ कोटी आहे.

राज्याची उपराजधानी नागपूर येथील पाचपावली परिसरातून ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश करत महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ७८ कोटी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. डीआरआयच्या छापा कारवाईत द्रव्य स्वरूपातील ५२ किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाची (DRI) ही कारवाई नागपूरच्या पाचपावली परिसरात करण्यात आली आहे. या प्रकरणी मास्टरमाईंड आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांना डीआरआयने अटक केली आहे.

सिंडिकेटनं आधीच द्रव स्वरूपात ५० किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन तयार केले होते. क्रिस्टलाइज्ड तसेच पावडर स्वरूपात उत्पादन बाहेर आणण्यासाठी त्यावर पुढील प्रक्रिया सुरू होती. सुमारे ७८ कोटी रुपये किमतीचे ५१.९५ किलो मेफेड्रोन द्रव स्वरूपात जप्त करण्यात आले आहे. तसेच कच्चा माल आणि उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. सिंडिकेटचा मास्टरमाइंड, फायनान्सर आणि एमडी बनवणाऱ्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

 १० ऑगस्ट रोजी डीआरआयकडून छापेमारीची मोहीम राबविण्यात आली  नागपूर शहरातील पाचपावली परिसरात एक बांधकामाधीन इमारतीत मेफेड्रोनचे (एमडी) गुप्तपणे उत्पादन होत आहे, अशी माहिती ‘डीआरआय’ला मिळाली होती.  मेफेड्रोनच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेली सर्व रसायने, साहित्य आणि यंत्रसामग्रीने सुसज्ज असलेली एक छोटी प्रयोगशाळा पाचपावली परिसरात एक बांधकामाधीन इमारतीत उभारण्यात आल्याचं छापेमारीदरम्यान समोर आले. मास्टरमाइंडनं प्रथम यंत्रसामग्रीचा संपूर्ण संच खरेदी केला. त्यानंतर सेटअप केला. १०० किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन तयार करण्याची क्षमता असलेला कच्चा मालदेखील आरोपींनी जमा केला होता.असे झालेल्या कारवाईत उघड झालं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!