भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनमहाराष्ट्रसामाजिक

मोठी बातमी : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने बाबत महत्वाची अपडेट, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी आपले समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना आणखी एक मोठी गूड न्यूज दिली आहे.

आता पर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत अर्ज दाखल केलेल्या अर्जांपैकी ९६ लाख ३५ हजार महिलांचे अर्ज मंजूर होऊन त्यांच्या खात्यात ३००० रुपये पठविण्यात आले आहेत. परंतु ज्या महिलांचे अर्ज आतापर्यंत मंजूर झाले नाहीत, परंतु त्यांचे अर्ज ३१ ऑगस्टपर्यंत मंजूर होतील आणि त्यांना दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबरमध्ये जुलैपासून एकत्र ३ महिन्यांचे पैसे मिळतील असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहेत.

जळगाव येथील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना आणखी एक गूड न्यूज दिली आहे. ज्यांचे अर्ज आतापर्यंत मंजूर झाले नाहीत. त्यांचे अर्ज देखील लवकरच ३१ ऑगस्ट पर्यंत मंजूर होतील आणि त्यांच्या खात्यातही लवकरच म्हणजे जुलै पासूनचे सर्व पैसे सप्टेंबर मध्ये जमा होतील असे फडणवीस यानी सांगितले.

ज्यांचे अर्ज ३१ ऑगस्ट पर्यंत प्राप्त होतील अशा सर्व लाडक्या बहिणांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे मिळून ४५०० रुपये एकत्र मिळतील.
अशी खात्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली.

बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक?
आता तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न आहे, अशा कुटुंबातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेत आतापर्यंत १ कोटी ३५ लाख अर्ज मंजूर झाले आहेत. रक्षाबंधणाच्या मुहूर्तावर १७ ऑगस्ट या सर्व महिलांच्या बँक खात्यात ३००० रुपये जमा होणार आहेत.

मात्र ज्या महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नाही, अशा महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाही. त्यामुळे अर्ज मंजूर झालेल्या सर्व लाडक्या बहिणींनी आपले बँक खाते आधारशी लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मात्र आतापर्यंत मंजूर झालेल्या अर्जां पैकी ३५ लाख अर्ज असे आहेत ज्यात महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नाही, या सर्व महिलांनी आपले खाते आधारशी लिंक करावे असे आवाहन देखील देवेंद्र फडणवीस यांनी केल आहे.
परंतु त्यांना या पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले नाही तर काळजी करू नका, बँक खाते आधार लिंक केल्यानंतर सप्टेंबरमध्ये पुढील टप्प्यात जुलै पासूनचे सर्व पैसे मिळतील असे देखील फडणवीस यांनी सांगितले आहे. ज्यांचे बँक खाते आधारलिंक नाहीत त्यांना बँकेत जाऊन खाते आधारलिंक करून घ्यावे लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!