भुसावळ मध्ये गुटखा गोडाऊन वर छापा, ५ लाखांचा गुटखा साठा जप्त
भुसावळ, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ शहरात एका गोडाऊन वर छापा टाकून सुमारे ५ लाख २० हजार रुपये किमतीचा राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई डी वाय एस पीं च्या पथकाने सोमवारी २९ जुलै रोजी सकाळी केली. या कारवाईमुळे गुटखा तस्कर व विक्रेत्यांमधे खळबळ उडाली आहे.
शहरातील खान्देश टोल काट्या समोरील एका पत्र्याच्या गोडाऊन वर डीवायएसपींच्या पथकाने छापा टाकून सुमारे ५ लाख २० हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला.या प्रकरणी गोडावून मालक किशोर आगीचा रा. सिंधी कॉलनी, भुसावळ. व उमेश भगवान पाटील वय-३० रा. लहान मारुती मंदिर जवळ, तापी नगर, भुसावळ. यांचेवर गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार नंदकिशोर सोनवणे, अनिल झुंजारराव, स्वप्निल पाटील, श्रीकांत ठाकूर
यांनी केली.