यावल तालुक्यातील सांगवी येथून गुटख्याची सर्रास तस्करी, बऱ्हाणपूर व जळगाव येथून आणला जातो लाखोंचा गुटखा
सावदा, ता. रावेर मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यातील सांगवी येथून राज्यात बंदी असलेला व आरोग्यास अपायकारक असलेला तंबाखूजन्य सुगंधित गुटख्याची मोठ्या प्रमाणावर सर्रास खुलेआम तस्करी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बऱ्हाणपूर येथून रावेर – उटखेडा – भाट खेडा या मधल्या मार्गे – खिरोदा – हिंगोणा – मार्गे मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या व महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची खुलेआम स्विप्ट या चारचाकी गाडीतून यावल तालुक्यातील सांगवी येथे तस्करी केली जाते. तसेच दुसरा मार्ग जळगाव ते किनगाव मार्गे यावल सांगवी अशा दुसऱ्या मार्गाने सुद्धा गुटख्याची तस्करी केली जाते.
तेथून तो विक्रीवर बंदी असूनही त्याची विक्री सांगावी, यावल, सावदा, भालोद फैजपूर, हिंगोणा, बामणोद, शिरसाड, साकळी किनगाव, अशा यावल – रावेर तालुक्यात विकला जातो….
क्रमश….


