भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

ब्रेकिंग : जळगावात डोक्यात धारदार शस्त्राने वार करून तरुणाची निर्घृण हत्या! अनैतिक संबंधातून हत्या?

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव मध्ये अधून मधून नेहमीच खून प्रकरणे घडतच असतात. अशातच जळगाव तालुक्यातील निमखेडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी १४ डिसेंबर रोजी रात्री १०:१५ च्या सुमारास सागर साहेबराव सोनवणे (वय २७) या तरुणाची डोक्यात धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नसले तरी अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची माहिती मिळत आहे.

​ मारेकऱ्यांनी सागर सोनवणे याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले आणि त्याला गंभीर जखमी अवस्थेत निमखेडी गावातील राममंदिराच्याजवळ फेकून दिले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तातडीने जखमी सागरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मयत घोषित केले.

दरम्यान हा खून कशातून झाला, याचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसले तरी, प्राथमिक तपासात अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय असून या खून प्रकरणी तालुका पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. अन्य संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे. मृत सागरच्या पश्चात त्याचे आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!