क्राईममुक्ताईनगर

मुक्ताईनगर मध्ये १४ लाख १६ हजारांचा गुटखा पकडला, माजी नगरसेवकांसह तिघे फरार

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | बऱ्हाणपूर- मुक्ताईनगर रोडवरील पूर्णा नदी पुलाजवळ अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नाशिक येथील गुप्त वार्ता पथकाने सापळा रचत मुक्ताईनगर येथे धडक कारवाई करत, राज्यात प्रतिबंधित असलेला व आरोग्यास अपायकारक असलेल्या तब्बल १४ लाख १६ हजार रुपये किमतीचा गुटखा, विमल पान मसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला. या प्रकरणात शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी नगरसेवक बबलू कोळी यांचे नाव समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन (FDA) गुप्त वार्ता विभाग, नाशिक यांना प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने बऱ्हाणपूर-मुक्ताईनगर रोडवर पाळत ठेवली. MH २० DF ५७९७ या क्रमांकाच्या टाटा इनोव्हा वाहनाचा पाठलाग करून पथकाने ते ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये ८ लाख १६ हजार रुपये किमतीचा विमल पान मसाला आणि व्ही-१ सुगंधी तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.

या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या साठ्यासह, अंदाजे ६ लाख रुपये किमतीचे टाटा इनोव्हा वाहन देखील जप्त करण्यात आले आहे. अशाप्रकारे, एकूण १४ लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतला आहे.

या प्रकरणी बबलू कोळी (रा. मुक्ताईनगर), अनुपम गोसावी आणि मध्य प्रदेशातील इच्छापूर येथील पुरवठादार यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आरोपी बबलू कोळी हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी नगरसेवक असल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणात राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. तिघेही आरोपी ह फरार झाले आहे.

ही यशस्वी कारवाई अन्नसुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता) अविनाश दाभाडे (नाशिक) आणि अन्नसुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर (जळगाव) यांनी केली असून या कारवाई मुळे राज्यासह  जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर, रावेर, यावल सह जिल्ह्यात व परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदी असलेल्या गुटख्याची अवैध विक्री व वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. मात्र या कारवाईने गुटका विक्रेते व तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली असून गुटख व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

काय जप्त केले
१)- केसरयुक्त विमल पानमसाला १२ पोते यांमध्ये प्रत्येकी २०० पाकिटे प्रति पाकीट किंमत रू १८७ साठा किंमत रू ४,४८,८०० /-

२)- व्हि १ सुगंधित तंबाखु १२ लहान पोते यांमध्ये प्रत्येकी २०० पाकिटे प्रति पाकीट किंमत रू ३३ साठा किंमत रू ७९,२००/-

३)- केसरयुक्त विमल पानमसाला ४ पोते यांमध्ये प्रत्येकी १०० पाकिटे प्रति पाकीट किमत रू ४७० साठा कि रू १,८८,०००/-

४)- व्हि १ सुगंधित तंबाखु ४ लहान पोते यांमध्ये प्रत्येकी १०० पाकिटे प्रति पाकीट किंमत रू ३० साठा किमत रू १२,०००/-

५)- केसरयुक्त विमल पानमसाला २ पोते यांमध्ये प्रत्येकी २०० पाकिटे प्रति पाकीट किमत रू १९८ साठा किमत रू. ७९,२००/-

६)- व्हि १ सुगंधित तंबाखु २ लहान पोते यांमध्ये प्रत्येकी २०० पाकिटे प्रति पाकीट किमत रू.२२ साठा किमत रू८.८,८००/-

7) ६,००,००० /- रुपये किमतीच पांढऱ्या रंगाचे टोयोटा इनोव्हा वाहन क्रमांक एमएच २०  डी एक ५७९७

एकुण साठा किंमत रू १४,१६,०००

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!