साडे ७ लाखांच्या गुटखा पकडला, दोन तस्कर ताब्यात
जामनेर, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : तालुक्यातील जळगाव-नेरी रस्त्यावर बेकायदेशीर अवैध सुमारे साडे सात लाखांचा किंमतीचा गुटखा, पानमसाला, तंबाखूची वाहतूक करणारा कंटेनर एकूण १५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यात आला असून सदरील कारवाईने खळबळ उडाली आहे.
- कोचुर खुर्द च्या लोकनियुक्त सरपंच ज्योती कोळी अपात्र
- पाडळसे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात, गटारी सफाई न झाल्यास संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
- निंभोरा स्टेशन परिसरातील सांडपाणी शोषखड्डा प्रकल्प रखडल्याने गटारीचे पाणी थेट रस्त्यावर
तालुक्यातील नेरी बुद्रुक ते नेरी टोल नाका दरम्यान बेकायदेशीररित्या गुटखा, पानमसाला, तंबाखूची कंटेनर (MH २० EL ७५५२) या क्रमांकाच्या वाहनातून नेण्यात येत असतात सोमवारी ३० मे रोजी सकाळी ६.३० वाजता पथकासह धडक कारवाई करत सुमारे ७ लाख ४८ हजार ८०० रुपये किमतीचा गुटख्यासह सामान आणि ८ लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण १५ लाख ४८ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणी जामनेर पोलिसात पोहेकॉ तुषार पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सोहेल जाफर शेख (वय २१) आणि सचिन शंकर बनकर (वय २६) दोन्ही रा. बालाजी नगर, औरंगाबाद या दोघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण शिंदे करीत आहे.