भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीयसामाजिक

ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग मिळाल्याचा दावा, जागा सील करण्याचे कोर्टाचे आदेश

वाराणसी, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणमध्ये तिसऱ्या दिवशी शिवलिंग सापडले आहे. त्यानंतर कोर्टाने जिथे शिवलिंग सापडले ती जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने एका याचिकाकर्त्याच्या अर्जानंतर हे आदेश दिले आहेत. ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणाचा आज तिसरा दिवस आहे. सर्वेक्षणाच्या नंतर हिंदू पक्षकारांच्या बाजूने असलेले डॉ. सोहनलाल यांनी मोठा दावा केला आहे, ते म्हणाले की, आतमध्ये शिवलिंग सापडले आहे. वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीमध्ये हिंदू मंदिरांचे अवशेष असल्याचा दावा हिंदू संघटनांकडून करण्यात आला आहे.

आत्तापर्यंत आत जे शोधण्यात येतं आहे. त्यापेक्षा जास्त सापडण्याची शक्यता आहे. आता पश्चिमच्या भिंतीच्या जवळ 75 फूट उंच, 30 फूट रुंद आणि 15 फूट लांब छिगारा आहे, त्याचा सर्वे करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात पोहचलेल्या मुस्लीम पक्षकारांची सुनावणी मंगळवारी होणार आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत तीन दिवसांपासून सुरू असलेले सर्वेक्षणाचे काम अखेर संपले आहे. तिसऱ्या दिवशी पाहणी पथकाने नंदीच्या मूर्तीजवळील विहिरीची तपासणी केली. या विहिरीमध्ये कॅमेरा टाकून पाहण्यात आले. हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांचा दावा आहे की विहिरीत शिवलिंग सापडले असून ते ताब्यात घेण्यासाठी सत्र न्यायालयातुन ती जागा सील करण्यात आली आहे. परंतु मुस्लिम संघटनांनी हिंदूंचा दावा फेटाळून लावला. पुरातन विहिरीच्या व्हिडिओग्राफीसाठी आत वॉटर प्रूफ कॅमेरा बसवण्यात आला होता. तिसऱ्या फेरीसह सर्वेक्षणाचे काम संपले. तीन दिवसांच्या पाहणीत ज्ञानवापी मशिदीच्या तळापासून ते घुमट आणि पश्चिमेकडील भिंतीपर्यंतचे व्हिडिओग्राफी करण्यात आली. आता हे पुरावे न्यायालयासमोर सादर केले जाणार आहेत.

हिंदू पक्षाचे वकील मदन मोहन यादव यांनी शिवलिंग सापडले असल्याचा दावा केला आहे. ज्ञानवापीच्या वाजुखानामध्ये 12 फूट 8 इंच शिवलिंग सापडले. नंदीच्या समोर असलेल्या विहीरीमध्ये कॅमेराद्वारे पाहणी करण्यात आली. तसेच पाण्याचा उपसा केल्यावर शिवलिंग सापडले आहे. हे शिवलिंग 12 फूट 8 इंच इतक्या आकाराचे आहे. हे विहिरीच्या खोलवर असून ते सापडल्यावर लोकांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि हर हर महादेव अशा घोषणा दिल्या आहेत.

हिंदू पक्षाकडून ज्ञानवापी मशिदीमध्ये साप, कलश, घंटा, स्वस्तिक, स्वान सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. तीन खोल्यांमध्ये साप, कलश, घंटा, स्वस्तिक, संस्कृत श्लोक आणि स्वान यांच्या मूर्ती सापडल्या आहेत. हा महत्त्वाचा पुरावा आहे. तसेच हिंदू मंदिरांचे खांब सापडले असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान सर्वेक्षणाचा अहवाल आणि सत्य १७ मे रोजी न्यायालयाच्या निर्णयानंतर बाहेर येईल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!