उताराला लागलेली गाडी अन् वैफल्यग्रस्त विरोधी पक्षनेता, राऊतांची फडणवीसांवर टीका
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शिवसेना माजी खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. उताराला लागलेली गाडी आणि विरोधी पक्षनेता यांना ब्रेक लागणं कठीण असल्याची टीका राऊतांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभेतून विरोधकांवर टीका केली आहे. यानंतर संजय राऊतांनीसुद्धा टीका केली आहे. यावेळी अपघात अटळ असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. फडणवीसांनी रविवारी उत्तर सभेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टिकेवर प्रत्युत्तर दिलं यानंतर आता संजय राऊतांनी टीका केली आहे.
शिवसेना माजी खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊतांनी ट्विट करुन अपघात अटळ असल्याचा इशारा दिला आहे. उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते. अपघात अटळ आहे. अशा आशयाचे ट्विट राऊत यांनी केले आहे.
- मुंबई-अयोध्या अमृत भारत एक्स्प्रेस सुरू! भुसावळसह “या ” स्थानकांवर थांबा ! मुंबई ते अयोध्या दरम्यान २४ साप्ताहिक फेऱ्या

- गावठी कट्टा व चार काडतुसांसह सुरत मधील सराईत गुन्हेगाराला अटक; ८.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

- शालार्थ घोटाळ्याच्या तपासाला वेग ; शाळांच्या १५ वर्षांतील तपासणीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश ! जळगाव जिल्ह्यातील १३९ शाळांचा समावेश






