“हनुमानजी मुस्लिम होते, ते पाच वेळा नमाज अदा करायचे, रामजी त्यांना नमाज शिकवत होते” शिक्षकाच्या दाव्याने खळबळ
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शिक्षक हे उद्याचे उज्वल भविष्य घडवत असतात. म्हणून समाजामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची मनाली जाते. विद्यार्थी हे देशाचे उद्याचे भविष्य आहेत. शाळेत शिकवत असताना ते मुलांना शिक्षण शिकवण्या सोबत खरं काय? आणि खोटं काय? यांमधील फरक समजावत असतात. शिक्षक हा गुरू स्थानी असतो. पण बिहार मधील बेगूसराय मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शिक्षकांनी मुलांना पाठ्यपुस्तकातील शिक्षण द्यायला हवे असताना एका शिक्षकाने आपल्या अकलेचे तारे तोडत मुलांना हनुमानजी संदर्भात वेगळीच माहिती शिक्षणातून दिली.
एका खाजगी शाळेतील शिक्षकाने हिंदूंचे पूजनीय दैवत हनुमाजींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्या मुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेगूसरायमधील हरिपूर येथील जियाउद्दीन या शिक्षकाने भगवान हनुमानजी यांच्यासंदर्भात शाळेत इयत्ता सातवी मधील मुलांना पाठ्यक्रमातील शिक्षणा ऐवजी वेगळेच शिक्षण दिले. “हनुमानजी पाच वेळा नमाज अदा करत होते. रामजी त्यांना नमाज शिकवत होते. तसेच हनुमानजी मुस्लिम समाजातील होते. असे या शिक्षकाने मुलांना शाळेत सांगितले.
शिक्षकाच्या या दाव्याने शाळेत मोठी खळबळ उडाली. घरी येऊन मुलांनी हा सर्व प्रकार पालकांना सांगितला. त्यामुळे पालक संतप्त होत लागलीच शाळेत पोहोचून या विधानावर आक्षेप घेतला. हिंदू संघटनांनी या प्रकरणात शाळेत तीव्र निदर्शने केली. त्या वेळी बीडीओ अभिषेक राज आणि ब्लॉक शिक्षण अधिकारी निर्मला कुमारी यांनी या प्रकरणाची शाळेत चौकशी केली. गोंधळ वाढत असल्याचे पाहून शिक्षकाने माफी मागितली. तसेच शिक्षकाने माफी मागितल्यानंतर प्रकरण शांत झाले असून शाळा व्यवस्थापनानेही शिक्षकाला ताकीद दिली आहे.
दरम्यान,बिहार सरकारने या प्रकरणात कारवाई करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री गिरिरारज सिंह यांनी केली. दरम्यान शिक्षण विभागाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.मात्र चौकशीत शिक्षकाने आरोप फेटाळले आहेत.