हतनूर धरण कालवा अवैध उत्खनन : “ती” अज्ञात माती चोर व्यक्ती कोण? अखेर गुन्हा दाखल
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज | रावेर तालुक्यातील हतनूर धरण प्रकल्प (तासखेडा शिवार) माती तस्करांनी हजारो ब्रास मातीचे अवैध उत्खनन करून लाखो रुपयांची मातीची तस्करी केली. मात्र संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून (आर्थिक हित संबंधातून) प्रकरण दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे.
तासखेडा शिवारातील हतनूर धरणाच्या कालव्याची माती अवैध उत्खनन करून वाहतूक करून विक्री केल्या बद्दल स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनाक २९ सप्टेंबर २०२५ रोजी वा त्या दरम्यान जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे पत्रव्यवहार /तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणी आ. एकनाथराव खडसे यांनी अधिवाशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून कारवाई करण्याची मागणी केली होती.
उपरोक्त प्रकरणी शासनाने काय चौकशी केली याची माहिती देण्यात यावी तसेच चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने हतनूर कालव्यातील मातीचे अवैध उत्खनन प्रकरणी संबंधित दोषींविरुध्द कोणती कारवाई केली वा करण्यात आली याची माहिती देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती.
सदर प्रश्नाला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले ते म्हणाले उपरोक्त प्रकरणी उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उप विभाग सावदा व श्रेत्रीय महसूल यंत्रणा यांचे मार्फत स्थानिक संयुक्त चौकशी करून पंचासमक्ष पंचनामा केला. हतनूर धरण कालव्यातील खोदकामामधून निघालेली अतिरिक्त माती कालव्याची लागत संपादित क्षेत्रा मध्ये साठवून ठेवण्यात आली. त्या पैकी एकूण ४५६५ ब्रास मातीची अवैध वाहतूक अज्ञान व्यक्तीकडून झाल्या बाबत उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग सावदा यांनी तहसीलदार रावेर यांना कळविले आहे.
सदरील मालमत्ता ही जलसंपदा विभागाच्या मालकीची असल्याने उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, सावदा यांना प्रस्तुत प्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत दिनांक
२०/११/२०२५ च्या पत्रान्वये सहायक पोलीस निरीक्षक, सावदा यांना कळविले आहे. त्यानुसार अनधिकृत उत्खनन कोणी केले, हे निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणी नियमानुसार संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
या संदर्भात पाटबंधारे विभाग गुन्हा दाखल करण्यासाठी चालढकल करीत होता.
पाटबंधारे विभागाला उशिरा सुचलेले शहाणपण
मात्र पाटबंधारे विभागाला उशिरा जाग आली की काय? की आता त्यांच्या निदर्शनास आले की काय? म्हणून अखेर हतनूर धरणाचे शाखा अधिकारी भावेश संजय चौधरी वय २८ वर्ष. याना माहिती नसेल की काय? म्हणून त्यांनी आता सावदा पोलिस स्टेशनला “अज्ञात” व्यक्ती विरोधात फिर्याद दाखल केली.
या संदर्भात हतनूर धरण जे इ एस जी चौधरी यांचेशी फोन करून संपर्क साधला असता त्यांनी आम्ही गेलो तेव्हा आम्हाला कोणीही आढळून आले नाहीत. म्हणून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
……तूर्त एव्हढेच….
( …….भाग….७)…


