भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

बलवाडी बा.ना. पाटील माध्यमिक विद्यालयात मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न

बलवाड़ी, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील बलवाडी येथील बा. ना. पाटील माध्यमिक विद्यालय या केंद्रात मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा – २०२६ तालुक्यातील विविध शाळातील १२७ विद्यार्थ्यांनी दिली. परीक्षेसाठी शालेय प्रशासनाकडून अतिशय चोख बंदोबस्त करण्यात आलेला होता.

परीक्षा शाळेचे उपक्रमशील व कृतिशील मुख्याध्यापक आदरणीय श्री. एन. व्ही. पाटील सर यांच्या मार्गदर्शनात सुरळीतपणे व शांततेत पार पडली. यावेळी केंद्रसंचालक म्हणून श्री. बी .बी. पाटील सर तर पर्यवेक्षक म्हणून श्री. बी.बी. चौधरी सर श्री. व्ही. टी. चौधरी सर श्री. राहुल येवले सर यांनी काम पाहिले. परीक्षा यशस्वीतेसाठी शालेय कर्मचारी अक्षय चौधरी, श्री. बंडू तायडे, श्री. गोपाल चौधरी तसेच मंथन वेलफेअर फाऊंडेशन तर्फे समन्वयक श्री. विलास तायडे सर, प्रशांत तायडे सर यांनी सहकार्य केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!