भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

मुख्यमंत्र्यांचा पीए असल्याचे सांगून जळगाव मध्ये लाखो रुपयांचा गंडा घालणारा हितेश अखेर पोलिसांच्या ताब्यात

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | मुख्यमंत्र्यांचा पीए असल्याचे भासवून रेल्वे विभागाचा मक्ता, रेल्वेत नोकरी, म्हाडाचे फ्लॅट, कंत्राट मिळवून देतो तसेच नोकरी लाऊन देतो अशी आदी आमिषे दाखवत तब्बल १८ जणांना ५५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या हितेश रमेश संघवी याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पीए बनून गंडा घालणाऱ्या हितेश संघवी याचे विरोधात ९ ऑगस्ट रोजी या प्रकरणी जळगाव शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हितेश संघवी हा तेव्हापासून फरार होता. पोलिसांनी त्याची पत्नी अर्पिता संघवीला मुंबईतून ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. हितेशची बँक खाती गोठवण्यात आली होती.

रविवार रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला मुंबईतील मैत्रिणीच्या भाड्याच्या फ्लॅटवरून ताब्यात घेतले.
सोमवार रोजी त्याला कोर्टात हजर केल्यावर ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

त्या वेळी आरोपीने फसवणुकीतील काही रक्कम पत्नीच्या खात्यात जमा केली आहे, तर उर्वरित पैसे कुठे आहेत?, याचा तपास करणे आवश्यक आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पीए बनून गंडा घालणाऱ्या हितेश संघवी याने आणखी काही जणांची फसवणूक केली आहे का?, याचा शोध पोलीस घेत असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!