हनीट्रॅप प्रकरण : रावेर मधील प्रतिष्ठित धनाढ्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या ब्लॅकमेलर महिलेसह मुलालाही अटक
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर शहरात प्रतिष्ठित व धनदांडग्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून शारीरिक संबंधाचे व्हिडिओ बनवून ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार खंडणी मागणाऱ्या महिलेला एक लाख रुपये घेताना रावेर पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली. या प्रकरणात आता ब्लॅकमेलर आरोपी महिलेसह तिच्या मुलालाही अटक करण्यात आली आहे. यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.
रावेर शहरातील एक प्रतिष्ठित धनदांडगा २ नोव्हेंबर २०१८ मध्ये स्वतःच्या कारने जळगावला जात असताना, चोपडा तालुक्यातील लोणी येथील ४३ वर्षीय महिलेने लिफ्ट मागिली असता त्यांनी लिफ्ट देऊ गाडीत बसवून घेतले.
या प्रवासा दरम्यान प्रतिष्ठित व महिला या दोघांमध्ये ओळख होऊन मैत्री झाली. मैत्रीतून जवळीक निर्माण झाली. त्यानंतर, महिलेने त्या व्यक्तीला जेवणासाठी बोलवले व कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध मिसळून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर, त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याचे व्हिडिओ चित्रित केले. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत ती महिला प्रतिष्ठित धनदांडग्या व्यक्तीला वारंवार खंडणी मागू लागली. हा प्रकार पुढे वाढतच गेला.
हा प्रकार २३ डिसेंबर २०२३ पासून सुरू होऊन ही महिला आणि तिचा मुलगा निर्मल पाटील (वय २१ वर्ष ) या दोघांनी फोन – पे द्वारे सुमारे ११ लाख रुपये उकळले. पुढे सदर महिलेची पैशांची मागणी वाढत जाऊन २१ फेब्रुवारी २०२५ रोजी महिलेने सदर प्रतिष्ठित व्यक्ती कडून ५ कोटी रुपये घेतल्याचा लेखी करारनामा पावतीही करून घेतली. सततच्या ब्लॅकमेलिंग च्या प्रकाराला कंटाळून अखेर सदर व्यक्तीने पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. व त्या वरून रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी सापळा रचून महिलेला १ लाख रुपये घेताना रंगेहात अटक केली. त्याच प्रकरणी पोलिसांनी आज तिचा मुलगा निर्मल पाटील वय २१ वर्ष यालाही अटक करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी रावेर पोलिस करीत आहेत .
दरम्यान, रावेरातील हनीट्रॅप प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले असून हा प्रतिष्ठित धनाढ्य व्यक्ती कोण ? या बाबत सर्वत्र मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा