भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

यावल तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यात यावल – चोपडा राज्य महामार्गावर यावल शहरापासून साडे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वढोदे गावाजवळ एका अज्ञात मोटर वाहनाच्या धडकेत एका ५० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना १६ मी रोजी सकाळी उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ ते १६ मे च्या रात्रीच्या सुमारास यावल – चोपडा राज्य महामार्गावरील यावल शहरापासून सुमारे ४ किलोमीटर अंतरावर बेहडे यांच्या कृषी केंद्राजवळ हा अपघात झाला. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका ५० वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाला. या गंभीर जखमी अवस्थेतील अज्ञात व्यक्तीला यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून या संदर्भात यावल पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून वढोदे येथील रहिवासी मुकुंद बहादूर बारेला यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिस स्टेशनला अज्ञात वाहन व चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!