नियम बाह्य भोंगे रडारवर : कारवाई न करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावरच होणार कारवाई, कुणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी देणार नाही – फडणवीस
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क आज विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजात धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत भोंग्यावरून प्रश्न विचारला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला असून यापुढे रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवलेच पाहिजे अशा सूचना केल्या आहेत.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रार्थना स्थळावरील व इतर ठिकाणी असलेल्या भोंग्यांबाबत
राज्य सरकारने नियमावली तयार केली असून संबंधित पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकावर याची जबाबदारी देण्यात आली आहे.

रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत भोंगे बंद ठेवलेच पाहिजे. या प्रकरणी कुणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी देणार नाही. त्या निश्चित कालावधी नंतर त्यांना पुन्हा परवानगी घ्यावी लागेल. सर्वांना भोंग्यांच्या आवाज मर्यादेचे पालन करावे लागेल. एका ठराविक कालावधीसाठीच भोंग्यांची परवानगी दिली जाईल. भोंग्यांच्या आवाजाच्या परवानगीची तपासणी करण्याची जबाबदारी पीआयची असेल. संबंधित पी आय ने हे प्रार्थना स्थळात जाऊन तपासायला हवे. दिवसा ५५ डेसीबल आणि रात्री ४५ डेसीबल इतकीच आवाजाची मर्यादा असेल, असे फडणवीस म्हणाले. प्रत्येक प्रार्थना स्थळात जाऊन डेसिबल मोजून जर डेसिबल पेक्षा जास्त आवाज येत असेल तर पुढची कारवाई करून त्यांना पुन्हा परवानगी देता येणार नाही. या नियमा च तंतोतंत पालन होतं आहे किंवा नाही हे काम संबंधित पीआय च असेल. या अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यात कुचराई केली तर त्यांच्यावरच कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला.