हॉटेल मालकाचा तगादा…सुसाईड नोट लिहून हॉटेल चालकाची आत्महत्या… काय आहे सुसाईड नोट मध्ये..
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | हॉटेलला मोठा खर्च केल्यानंतर भाडेतत्त्वावर घेतलेली हॉटेल खाली करून देण्यासाठी हॉटेल मालक व त्यांचा मुलगा यांनी सतत तगादा लावल्याने त्यास कंटाळून यावल तालुक्यातील रहिवाशी हॉटेल चालक आशिष मधुकर फिरके वय ४८ वर्ष. रा. सांगवी, ता. यावल, ह.मु. संत निवृत्ती नगर, जळगाव. यांनी जळगाव येथील रौनक हॉटेल मधेच ध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना १४ सप्टेंबर रविवार रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
आशिष फिरके हे जळगाव येथील रिंगरोडवरील जागेत
(हॉटेल रौनक) तीन वर्षापासून हॉटेल व्यवसाय करीत होते. यासाठी जागा मालकाला तीन वर्षाचे ॲग्रीमेंट करून दिले होते. परंतु जागा मालक सतत तगादा लावत होता. तसेच वेळोवेळी त्याचा मुलगाही खूप धमक्या देत होता. त्यामुळे आत्महत्या करीत आहे, असे सुसाईड नोटमध्ये नमूद करून व ती स्टेटसवर ठेवून आशिष फिरके यांनी रिंग रोडवरील हॉटेल रौनक मध्ये रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गळफास घेतला. फिरके यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. आशीष फिरके यांनी रात्री १२:४० वाजता सुसाईट नोटचे स्टेटस ठेवले होते. सदरचे स्टेटस फिरके यांच्या एका ग्राहकाला रात्री ते दिसले. त्यानंतर ते जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पोहोचले व या विषयी माहिती दिली. त्यावेळी पोउनि शांताराम देशमुख, पोहेकॉ महेंद्र पाटील हे या ग्राहकाला घेऊन हॉटेलमध्ये पोहचले. फिरके हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.
काय लिहिलंय आशिष फिरके यांनी सुसाईड नोट मध्ये….
मी आशीष मधुकर फिरके असे लिहून देतो की, माझ्या मौतीला जबाबदार फक्त आणि फक्त रामसहाय शर्मा म्हणजे हॉटेल रोनक या जागेचे मालक. मी त्यांच्या जागेत तीन वर्षांपासून हॉटेल व्यवसाय करतो. मला यांनी आधी तीन वर्षांचे ॲग्रीमेंट करून दिले होते आणि आता मला सागितले की, बेटा टेन्शन मत ले, मै ॲग्रीमेंट तीन साल का कर दूंगा. त्यांनी मला सांगितले तू तेरे हिसाबसे हॉटेल बना ले. मी खूप खर्च पण लावला आणि आता अचानक त्यांनी मला जागा खाली करून दे असे सतत टॉचिंग करत होते. मी खूप विनंती करूनही मला त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले. मी त्यांना सांगितले की, मला दोन लहान मुले आहे, त्यांचा तरी विचार करा. तर ते मला म्हटले की मुझे कुछ लेना देना नही आणि मला खूप टॉचिंग करत होते. वेळोवेळी त्यांचा मुलगा रजनील रामसहाय शर्मा यांनी खूप धमक्या दिल्या म्हणून मी आत्महत्या करत आहे. -आशीष मधुकर फिरके

