भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमधरणगाव

चारित्र्याच्या संशयावरून पतीचा पत्नी व मुलावर कुऱ्हाडीने हल्ला, पत्नी ठार, मुलगा गंभीर

धरणगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नी व मुलावर कुऱ्हाडीने हल्ला करत पत्नीला ठार केल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यात हनुमंतखेडा येथे घडली असून यात त्याचा मुलगा देखील गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भात धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथील रहिवासी सोमनाथ उर्फ सोन्या अशोक सोनवणे हा पत्नी शीतल उर्फ आरती हिच्यावर नेहमी चारित्र्याबाबत संशय घेऊन मारहाण करत असत. शुक्रवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास सोमनाथने पत्नी शीतल उर्फ आरती हिच्यावर कुऱ्हाडीने जोरदार वार केले. यात तिचा मृत्यू झाला. त्या सोबत त्याने त्याचा दहा वर्षाचा मुलगा सिध्दू सोमनाथ सोनवणे याच्यावरही वार केले असून तो देखील यात गंभीर जखमी झाला आहे.

या प्रकरणी मयत शीतल उर्फ आरती सोमनाथ सोनवणे हिचा भाऊ भाऊसाहेब भावलाल पवार (रा. हनुमंतखेडा. ता. धरणगाव ) यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्या नुसार, सोमनाथ उर्फ सोन्या अशोक सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश वाघ, उपनिरिक्षक संतोष पवार व हवालदार राजू पाटील हे करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!