भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपी फरार

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना यावल तालुक्यात घडली. या प्रकरणी पोस्को कायद्यांतर्गत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रात्री नऊ ते साडे नऊ वाजेच्या सुमारास मुलीचे वडील घरात झोपलेले असताना आरोपी भालचंद्र पाटील घरात घुसला आणि त्याने मुलीचा उजवा हात पकडून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. मुलीने घाबरून आरडा – ओरडा केला असता, आरोपीने तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत तेथून पळ काढला. तर वेळी मुलीची आई देवदर्शनाला गेली होती. देवदर्शनहून आल्यानंतर मुलीने तिच्या आईला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी यावल पोलिसात तक्रार दाखल केली असता याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आरोपी भालचंद्र पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मात्र आरोपी भालचंद्र पाटील फरार झाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!