भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

ब्रेकिंग : पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून पतीची हत्या, रावेर तालुक्यात खळबळ

निंभोरा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रावेर तालुक्यातील निंभोरा गावात कौटुंबिक वादातून एका महिलेने आपल्या पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली. ही घटना रात्री १०.५९ वाजेला निंभोरा येथे घडली असून या घटनेने निंभोरा सह रावेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पत्नीला ताब्यात घेतले आहे. सततच्या भांडणातून हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील निंभोरा येथील गणेश कॉलनीतील रहिवासी हुसेन रसूल तडवी (वय-६२) आणि त्यांची पत्नी फर्जाबाई हुसेन तडवी (वय-५५) यांच्यात नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत असत. घटनेच्या दिनाक ३०ऑगस्ट रोजी रात्रीही त्यांच्यात असेच भांडण झाले असावे. या भांडणातून राग अनावर झाल्याने रात्री १०. ५९ वाजेच्या सुमारास आरोपी फर्जाबाईने कुऱ्हाडीने हुसेन तडवी यांच्यावर वार केले असावेत, आणि त्यातच हुसेन तडवी यांचा जागीच मृत्यू झाला असावा. असा सहायक पोलीस निरीक्षक श्री. बोचरे यांनी अंदाज व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी पत्नी फर्जाबाईला ताब्यात घेतले असून, तिची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!