“मी तुला स्थायी आदेश तयार करुन देतो त्यासाठी मला ३ हजार रुपये द्यावे लागतील” २ हजारांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी जळगाव एसीबी च्या जाळ्यात
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | स्थायी आदेश देण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना जळगाव जिल्ह्यातील पारोळा कुटीर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याला जळगाव लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले.
अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार हे अनुकंपा तत्वावर कुटीर रुग्ण्यालय पारोळा जि. जळगांव येथे सफाई कामगार या पदावर नोकरीस आहे. तकारदार यांचे स्थायी आदेश मिळण्यासाठी वैद्यकीय अधिकारी कुटीर रुग्णालय पारोळा यांना दि.१३. ०४.२०२६ रोजी अर्ज करुन त्यांनी दुय्यम प्रत तक्रारदार यांनी घेतलेली होती. त्यांनतर दि.२४.०४.२०२६ रोजी तक्रारदार हे वैद्यकीय अधिकारी विजय वाघ यांना भेटुन स्थायी आदेश संदर्भात विचारपुस केली असता त्यांनी “मी तुला स्थायी आदेश तयार करुन देतो त्यासाठी मला ३०००/- रुपये द्यावे लागतील” असे सांगितले होते. तेव्हा तकारदार यांनी माझे जवळ आता पैसे नाहीत मी तुम्हाला नंतर येवुन भेटतो असे सांगुन तकारदार यांना लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी दि.२८.०४.२०२६ रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो जळगांव येथे तकारदार दिली.
सदर तक्रारदार यांनी दिलेल्या तकारी प्रमाणे दि.२८.०४.२०२६ रोजी पंचासमक्ष कुटीर रुग्णालय पारोळा येथे पडताळणी केली असता यातील विजय वाघ यांनी तक्रारदार यांचे स्थायी आदेश देण्यासाठी ३०००/- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती २०००/- रुपये लाच रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
आरोपी वैद्यकीय अधिकारी विजय प्रकाश वाघ, वय ४२ वर्षे, व्यवसाय नोकरी, सहायक अधिक्षक, कुटीर रुग्णालय पारोळा ता. पारोळा जि. जळगांव खाते आरोग्य विभाग वर्ग-३. .प्लॉट नं.४६, कृष्ण कलम हौसिंग सोसायटी, धुळे. याना अटक करून त्यांचे विरुध्द पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रकीया सुरु आहे. आरोपी विजय वाघ च्या अंगझडतीत रोख ३३०/- रुपये व एक Vivo कंपनीचा मोबाईल फोन असा मुद्देमाल मिळून आला.
सापळा कारवाई पर्यवेक्षण व सापळा अधिकारी योगेश ठाकूर, पोलिस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव. तपास अधिकारी हेमंत नागरे, पोलिस निरीक्षक,
सापळा पथक: GPSI सुरेश पाटील, पाहेकों सुनिल वानखेडे, पोहेका बाळू मराठे यांनी यशस्वी पार पडली.

