भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

जुळून आल्यास उद्याच नवीन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर कोण उपमुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू असताना राज्याच्या नूतन उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा होत असून त्यांना उपमुख्यमंत्री करावे, अशी मागणी होत आहे.

छगन भुजबळ माध्यमांशी बोलताना म्हणाले की, उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा होत आहे. त्यांना उपमुख्यमंत्री करावे, अशी मागणी होत आहे. उद्या शनिवार रोजी आमदाराची बैठक बोलावली आहे. सारे जुळून आल्यास, तर उद्याच शपथविधी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची शनिवारी बैठक होणार असून त्यात विधिमंडळ पक्षनेतेपदाची आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या नावाची निवड केली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे या नेत्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच अजित पवारांची खाती आणि इतर मुद्यांवर चर्चा झाली

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असतानाच उपमुख्यमंत्री पदावरून चर्चा सुरू झाली आहे. अनेकांचे म्हणणे आहे की सुनेत्रा पवार यांची निवड अजित पवारांच्या पदावर करण्यात यावी. त्यानुसार राजकीय वर्तुळात हालचाली देखील सुरू असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तटकरे यांनीही पत्रकारांशी संवाद साधला असून, उपमुख्यमंत्री पदाबाबत धार्मिक विधी झाल्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!