भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

परवानगी शिवाय दारू आढळल्यास… हॉटेल मालक व पोलिसांना गृहराज्य मंत्र्यांचा सज्जड इशारा

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | कुठल्याही परवानगी शिवाय हॉटेल आणि रेस्टॉरंट मध्ये दारू आढळल्यास संबंधितांचे परवाने रद्द करण्यात येतील, तसेच त्या क्षेत्रातील पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांवरही आवश्यक कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिला.

विधान परिषदेचे आमदार दादाराव केचे यांनी वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील हॉटेलमधील अवैध व्यवसायाबाबत विधान परिषदेतउपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भोयर यांनी कारवाईचा इशारा दिला.

अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान विधान परिषद सभागृहात हॉटेल मधील अवैध व्यवसायाबाबत चर्चा केली गेली.त्या वेळी गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी म्हटले आहे की,ज्यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत परवानगी शिवाय हॉटेल आणि रेस्टॉरंट मध्ये मद्य आढळेल त्या क्षेत्रातील पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सज्जड इशारा
हॉटेल मधील अवैध व्यवसायाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भोयर यांनी हॉटेल मालक, पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना सज्जड इशारा दिला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!