मुद्देमालासह २४ लाखांचा अवैध गुटखा जप्त, शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई
शिरपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शिरपूर पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. शासन गुटखा विक्रेते व तस्करांवर मोकाका लावणार असताना या कारवाईत पोलिसांनी सुमारे बोलोरो चारचाकी गाडी सह २४ लाखांचा तंबाखूजन्य अवैध गुटका पकडला असून हा गुटखा कोणाचा? याचा मालक कोण? कुठून आणला गेला हा लाखो रुपयांचा गुटखा? असे अनेक प्रश्न निर्माण झाले
या संदर्भात अधिक माहिती अशी की, शिरपूर तालुका हद्दीत सकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास बोलोरो MH 19CX 2551 या क्रमांक चे वाहन उभे असताना पोलिस गाडीतून गस्त करत असणाऱ्या पोलिसाने त्याच्या चालकास गाडीत काय आहे याची विचारणा केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. असता. पोलिसांनी चौकशी के त्या मुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गाडीची तपासणी केली असता त्या गाडीत त्यांना विमल सुगंधित पानमसाला आणि तंबाखू ने भरलेल्या ३० गोण्या आढळून आल्या. एका गोणीची किंमत ४५ हजार ७५० रुपये इतकी असून एकूण ३० गोण्या ची किंमत १३ लाख ७२ हजार रुपयांचा तंबाखू जन्य गुटखा तसेच वाहनाची किंमत १० लाख रुपये असून असा एकूण २३ लाख ७२ हजार रुपयाचा मुद्देमाल शिरपूर तालुका पोलीसांनी जप्त करून जमा केला आहे. गाडीचा चालक सागर चौधरी यास पोलिसांनी लाब्यात घेतले असून त्या गाडीचा मालक कोण ? हा सुगंधित तंबाखूजन्य गुटखा कोणाचा? असा प्रश्न उपस्थित केला जात असून यावी चौकशी पोलीस प्रशासन करत आहे.

