बेकायदेशीर वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, आलिशान बंगल्यात छापा, चार महिलांची सुटका,तिघांना अटक
जळगाव.मंडे टु मंडे न्युज |जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्राळा हुडको परिसरात एका बंगल्यात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली असून, तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांना पिंप्राळा परिसरातील एका बंगल्यात बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून पडताळणी केली. माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिस पथकाने संबंधित बंगल्यावर छापा टाकला.
या कारवाईदरम्यान चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच तीन ग्राहक आणि एका पंटरविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी एका महिलेसह दोन पुरुष अशा तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कारवाईचा तपशील :
पीडित महिला : ०४ (सुटका)
ग्राहक : ०३ (ताब्यात)
पंटर : ०१
अटक आरोपी : ०३ (एक महिला व दोन पुरुष)
या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या व्यवसायामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सह्याद्री बिर्ले व रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे, PSI दिनेश बडगुजर, राजेश पाटील, सहाय्यक फौजदार संजय हिवरकर, भूषण कोल्हे, अनिल पाटील, मनीषा पाटील, राखी खाटीक, पोलीस हवालदार दीपक पाटील, किरण धनगर, संगपाल तायडे, अमित माळी, जितेंद्र राजपूत आणि जितेंद्र राठोड यांच्या पथकाने केली.


