‘रात्रीस खेळ चाले’…. अवैध वाळू चोरट्यांकडे प्रशासनाचा होतोय कानडोळा !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि | तालुक्यामध्ये अवैध रेती चा व्यवसाय प्रशासनाच्या पाठबळामुळे जोरात सुरू असून प्रशासनाचे अर्थ पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे कुठलाही रेती चा ठेका प्रशासनाने दिलेला नसून देखील रात्रीच्या सुमारास अवैध रेती हजारो ब्रास उपसा मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असून प्रशासनाचा काना डोळा का होत असावा असा गंभीर प्रश्न ? नागरिकांमध्ये उपस्तीत होत आहे.
मुक्ताईनगर शहरांमध्ये रात्रीच्या सुमारास रेतीचे भरलेले ट्रॅक्टर ,डंपर, ट्रक व इतर साधने असे मोठ्या प्रमाणात येत भर वेगाने चालत असून यांच्या तपासण्या होत नाही का मागील तहसीलदार श्वेता संचेती यांनी मोठ्या प्रमाणात भरलेल्या गाड्यांच्या गाड्या रेती च्या पकडल्या होत्या परंतु आता सध्या स्तित प्रभारी असलेले तहसीलदार मुक्ताईनगर चे तहसीलचे तहसीलदार पदी विराजमान होऊन कामकाज पाहत आहे परंतु यांना अशा गोष्टींबाबत माहिती नसेल का की याकडे अनिकेत वाढे हे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहे तत्कालीन तहसीलदार श्वेता संचिती गेल्यापासून बोटावर मोजण्या इतकीच कारवाई होताना दिसून येत आहे. त्या महिला असून देखील रात्री बे रात्री आपले कामगिरीचे कर्तव्य बजावत आपली कामगिरी करताना आढळून आल्या.
परंतु आताचे प्रभारी तहसीलदार रात्रीच्या सुमारास कारवाई करतांना आढळून येत नाही. रात्रीच शेकडो ट्रॅकटर भरवेगाणे चालत असतात मात्र तहसीलदार कुंभकर्णाच्या झोपेत आहे का असा प्रश्न ? नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. तलाठी यांनी वाळू च्या भरलेल्या ट्रक वरती कारवाई करावी व तहसील दार यांच्याकडे सुपूर्त करावी असा प्रकार मुक्ताईनगर शहरात होत आहे अशा या कारवाई संदर्भात तलाठी यांना बातमीसाठी कॉल केला असता मी माझी कारवाई केलेली आहे व सर्व अहवाल मुक्ताईनगर तहसीलदार यांच्याकडे दिलेले आहे तरी सर्व माहिती हे मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालय मधून तुम्हाला मिळेल
मुक्ताईनगर तालुक्यामध्ये दोन डिसेंबर या दिवशी वडोदा येथील तलाठी गायकवाड यांनी रात्रीच्या दोन वाजेच्या सुमारास गिरणा रेतीचा भरलेला ट्रक पकडला असता तो ट्रक त्या ठिकाणी च रात्री च्या सुमारास सालबर्डी गावामध्ये हनुमान मंदिराच्या मागे खाली करण्यात आला खाली करण्याचे कारण देखील गुल दस्त्यात बंद आहे त्यादरम्यान गायकवाड यांनी नेमका तो ट्रक खाली करण्याचे कारण काय त्या ठिकाणीच का खाली केला गेला असेल असा प्रश्न मुक्तानगर वासीयांना उपस्थित होत आहे त्या ट्रक मध्ये साधारणता साडेपाच ते सहा ब्रास वाळू बसते परंतु दोन ब्रासच वाळू दाखवली गेली आहे व कारवाई दोन ब्रास वाळू वरती केली गेली आहे व वाळूचा ट्रक जर पकडला गेला तर तो पूर्ण सालबर्डी या गावांमध्ये का खाली करण्यात आला यामागचे गुपित रहस्य काय ?
मुक्ता नगर तहसीलदार यांना या संदर्भात कॉल केला असता आम्ही कारवाई केलेली आहे आमच्याकडे कारवाई ठिकाणचे रात्रीच्या वेळेचे जीपीएस फोटो देखील आहे आम्ही तुम्हाला फोटो देऊ शकतो परंतु या संदर्भात काढलेले जीपीएस फोटो बातमी करण्यासाठी मागितले असता अद्यापही फोटो मिळू शकले नाही व या संदर्भात कॉल केला असता कॉल रिसिव्ह करण्यास तहसीलदार असमर्थ ठरत आहे कॉल रिसीव न करण्याचे कारण काय कॉल रिसिव्ह केलाच तर मी ऑफिस ला नाही आहे आलो कि कॉल करतो व मी 4 वाजेला येईल असे सातत्याने सांगण्यात येते व GPS काढलेले फोटो तहसीलदार अद्याप ही देऊ शकले नाही. दोन आमदार व एक खासदार असून देखील आठ महिन्यापासून कायमस्वरूपी तहसीलदार मुक्ताईनगरला मिळेना नेमके अधिकारी न येण्याचे कारण काय ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.