दसनूर तांदलवाडी परिसरात पावसासह वादळी वार्याने केळी पिकाचे नुकसान
बलवाड़ी, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी |
गेल्या आठवड्यात जाणवणाऱ्या उष्म्यानंतर शुक्रवारी दि.६ रोजी दुपारनंतर तांदलवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यावेळी आलेल्या वादळी वाऱ्याने केळी पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली.
तांदलवाडी,मांगलवाडी,उदळी,बलवाडी,दसनूर सह परिसरात वादळी वाऱ्याचा फटका बसून नुकसान झाले.दुपारी व सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने परिसरात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे केळी आडवी झाल्याने मोठे नुकसान झाले.तसेच झाडांच्या फांद्याही तुटल्याने काही काळ वीजपुरवठा खंडीत झाला होता.

