भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

फैजपूर शहरासह परिसरात सर्रास अवैध वाळू वाहतूक ; कठोर कारवाई ची मागणी

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | फैजपूर सह परिसरात गेल्या काही महिन्यापासून अवैध वाळू बिनधास्त आणि जोराने सुरू असून या अवैध वाहतूक रोखण्यास महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत असून प्रशासन बघायची भूमिका घेत आहे काय असा प्रश्न उपस्थित केला जात असून शासनाचा लाखोरुपयांचा महसूल बुडत आहे. महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कठोर कारवाई करावी. या संदर्भात प्रांताधिकारी फैजपूर यांना निवेदन देण्यात आले आहे.

शहरातील मिल्लत नगर भाग नवीन वस्ती झोपडपट्टी महानगर यांच्यासह अनेक भागांमध्ये दररोज झोपडपट्टी मध्ये राहणारे दोन व्यक्ती विशिष्ट समाजाचे अंगावर भगवा रुमाल टाकून सत्ताधारी पक्षाला बदनाम बदनाम करीत असल्याचे सर्वत्र नागरिकांना पाहायला मिळत आहे.

तसेच मधुकर सहकारी साखर कारखाना हा परिसर वाळू माफिया चा केंद्रबिंदू बनलेला असून या ठिकाणातून फैजपुर सह परिसरात वाळूचे डंपर जमा होऊन रात्री 10 वाजेच्या नंतर त्यांची रात्रभर वेगवेगळ्या ठिकाणी विल्हेवाट लावली जात आहे.
फैजपूर येथील झोपडपट्टीत राहणारे “हे”  दोन्ही व्यक्ती दररोज दहा ते पंधरा डंपर बिनधास्तपणे फैजपूर शहरात सर्वत्र टाकून सकाळी मोकळे होतात या वेळात प्रशासन झोपेत असते की झोपेचे सोंग घेते या वेळात हे वाळू माफिया त्यांचे काम पूर्ण करून घेतात आणि दिवसभर नियोजन करून घेतात महसूल विभाग आणि पोलीस प्रशासक यांनी संयुक्त मोहीम राबवून कठोर कारवाई करावी अशी मागणी फैजपूर शहरातील पत्रकार सलीम पिंजारी यांनी फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी बबनराव काकडे यांच्याकडे लेखी निवेदन देऊन विनंती केली आहे

निवेदनात म्हटले आहे की येत्या दिवसात या वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी तसेच अवैध वाळू कायमस्वरूपी बंद करावी अन्यथा उपोषणाला बसावे लागेल असेही निवेदनात नमूद केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!