भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

श्री गजानन गणेश मित्र मंडळ व आई जगदंबा दुर्गा मित्र मंडळ, संताजी नगर मुक्ताईनगर तर्फे श्री ज्ञानेश्वरी पारायण व शिवमहापुराण कथेचा भव्य सोहळा

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा श्रीखजाना गणेश मंदिर, संताजी नगर मुक्ताईनगर द्वारा यावर्षी सुद्धा दिनांक 27 डिसेंबर 2025 वार शनिवार पासून ते 3 जानेवारी 2026 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण व श्री शिव महापुराण कथा सोहळा आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे सकाळी 5 ते 6.30 काकडा भजन, सकाळी 7.30 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, संध्याकाळी 4.30ते 5.30हरिपाठ, रात्री 7.30ते 10 शिव महापुराण कथा. 3 जानेवारी 2026 शनिवार रोजी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज पाटील गोडेगाव बुद्रुक यांचे काल्याचे किर्तन सकाळी 10 वाजेला असून दुपारी 1 ते 4 पर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

याप्रमाणे कार्यक्रम असणार आहेत. ज्ञानेश्वरी पारायण वाचक हरिभक्त परायण श्री सुदाम महाराज बघे व शिव महापुराण कथा वाचक हरिभक्त परायण गुरुजी श्री प्रदीप महाराज पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय वारकरी परिषद पालघर आहेत. त्यांच्यासोबत हरिभक्त परायण वैभव महाराज नवले मेहकर, हरिभक्त परायण ललित महाराज ठाकूर आळंदी देवाची, हरिभक्त परायण प्रवीण महाराज सोनवणे अकोला, हरिभक्त परायण जयेश महाराज भुस्कर, हे त्यांना संगीत साथ देणार असून हरिपाठ व काकडा हरिभक्त परायण संतोष महाराज वढवे, हरिभक्त परायण उमेश महाराज मुक्ताईनगर, हरिभक्त परायण निखिल महाराज घोडसगाव, करणार आहेत तरी कथेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री गजानन गणेश मित्र मंडळ व आई जगदंबा दुर्गा मित्र मंडळातर्फे संपूर्ण मुक्ताईनगर तालुका वासी यांना करण्यात येत आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!