क्राईमभुसावळ

धक्कादायक : अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती, भुसावळ तालुक्यातील घटना

भुसावळ, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ तालुक्यात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. ती अल्पवयीन मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आले.

भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरातील एका गावात एक १४ वर्षीय मुलगी कुटुंबासह रहात असताना आईला मुलीच्या प्रकृतीवर संशय आल्याने आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने सर्व घडलेली धक्कादायक घटना सांगितली असता आईला मोठा धक्काच बसला. लागलीच आईने पिडीत मुलीला डॉक्टरकडे तपासणीसाठी नेले असता तिच्या पोटात सहा महिन्यांचा गर्भ असल्याचे समोर आले.

घराशेजारील राहणारा नीलेश संजू निळे या तरुणाने अंदाजे ७ महिन्यांअगोदर त्याचे घरातील हॉलमध्ये पिडीत मुलीवर अत्याचार केला असल्याचे पिडीत मुलीने सांगितले. त्यानंतर पुन्हा ५ सप्टेंबर २०२४ रोजी घरात बोलावून अत्याचार केल्याची हकीकत पीडित मुलीने तिच्या आईला सांगितल्यामुळे ही घटना उघडकीस आली.

याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित नीलेश संजू निळे याच्या विरोधात वरणगाव पोलिस स्टेशनला पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सह पोलिस निरीक्षक सुशील सोनवणे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!