आमदारांनी विमलची गाडी पकडली आणि दुसऱ्या दिवशी D. Y. S. P. च्या पथकाने मारला अवैध पत्त्याच्या क्लब वर छापा
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी l मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच मुक्ताईनगर मध्ये राज्यात प्रतिबंधित असलेल्या विमल गुटखा भरलेली गाडी पकडली आणि दुसऱ्याच दिवशी मुक्ताईनगर मधील मुक्ताईनगर – बऱ्हाणपूर महामार्गावर टोल नाक्याजवळ साईराज ढाब्याच्या मागच्या बाजूला सुरू असलेल्या एका पत्त्याच्या क्लब वर छापा टाकून सुमारे १ लाख ४७ हजार ६०० रूपयांचा ऐवज जप्त केला.
मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत.संबधीत सर्वच आपापली पोळी भाजून घेत आहेत. अनेक अवैध धंदे कोणाच्या न कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत. त्यांच्यावर कुठलीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. आणि त्यातच मुक्ताईनगर च्या आमदारांनी मुक्ताईनगर मध्ये अवैध गुटख्याची गाडी पकडली. असे असताना मुक्ताईनगर – बऱ्हाणपूर महामार्गावर टोल नाक्याजवळ साईराज ढाब्याच्या मागच्या बाजूला सुरू असलेल्या एका घरात झन्ना-मन्ना जुगार खेळत असताना त्या पत्त्याचा क्लब वर पोलीस पथकाने छापा टाकून पोलिसांनी रोकड रक्कम व अन्य सामग्रीसह सुमारे १ लाख ४७ हजार ६०० रूपयांचा ऐवज जप्त केला आहे.
या प्रकरणी शांताराम जीवराम मंगळकर, रा. लाल रेल्वे स्थानकाजवळ, बऱ्हाणपूर. गणेश वसंत पाटील, रा. पुरनाड ता. मुक्ताईनगर. महेंद्र बापूराव नाईक, रा. जुने गाव, मुक्ताईनगर. युवराज संतोष महाजन, रा. निंभोरासीम, ता. रावेर. सुनील किसन बेलदार, रा. कुऱ्हा ता. मुक्ताईनगर. राजेश सिताराम वाकोडे. रा. नांदुरा, जिल्हा बुलढाणा. तसेच जागा मालकासह अन्य सहा संशयित संशयितां विरुद्ध मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मुक्ताईनगरचे डी वाय एस पी राजकुमार शिंदे, psi राजेंद्र खनके, विजय कचरे, छोटू वैद्य,विशाल सपकाळे, चेतन गवते, देवसिंग तायडे, व पोलिस पथकातील सागर सावे, राजेश महाजन, विशाल पवार,प्रशांत चौधरी, संतोषकुमार भारूडे, यांच्या पथकाने केली.