भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

सर्वसामान्यांना झटका : गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, पेट्रोल-डीझल ही महागणार

मुंबई, मंडे टु मंडे न्युज | सर्वसामान्य ग्राहकांना झटका देणारी बातमी आहे. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. घरगुती गॅस सिलेंडर तब्बल ५० रुपयांनी महागला आहे. आज रात्रीपासून नवी दरवाढ लागू होणार आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे.

घरगुती LPG गॅस सिलेंडरचे दर तब्बल ५० रुपयांनी वाढले असून उज्वला योजनेतील ग्राहकांना देखील ही गॅस सिलेंडरची दरवाढ लागू होणार आहे. LPG गॅस सिलेंडरचे दर ८०२ रुपये आहेत. दरवाढ लागू झाल्यानंतर ग्राहकांना एका सिलेंडरसाठी ८५२ रुपये मोजावे लागणार आहेत. आज मध्यरात्री पासून ही दरवाढ लागू होणार आहे.

उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणारे सिलेंडर ५५० रुपयांवर गेला आहे. तर बिगर उज्ज्वला योजनेतील सिलेंडर च्या
दरात ५० रुपयांची वाढ झाली आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत माहिती दिली.

पेट्रोल डिझेल ही महागणार

सरकारने देशातील पेट्रोल आणि डिझेलवर एक्साईज ड्यूटीत २ रुपये प्रति लीटर दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ होणार आहे. वाढलेल्या एक्साईज ड्यूटीमुळे तेल कंपन्या या तेलाच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात लवकरच मोठी वाढ होण्याची शक्यता असून पेट्रोल-डीझेलचे नवे दर ८ एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात प्रत्येकी 2 रुपयांची वाढ करण्यात आलीय. मात्र पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थेच राहणार आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ होणार नाही असे सांगितले जात आहे.कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत राहिल्याने त्याचा मोठा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसला आहे. त्यामुळे आता पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये भविष्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र ही वाढ एका ठराविक अंतराने केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे

कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत राहिल्याने त्याचा मोठा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसला आहे. त्यामुळे आता पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये भविष्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र ही वाढ एका ठराविक अंतराने केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!