आंतराष्ट्रीय

Breaking : पाकिस्तानचं लाहोर शहर स्फोटांनी हादरलं, वॉल्टन एयरपोर्टजवळ मोठे धमाके !

Operation Sindoor : पाकिस्तानच्या लाहोर शहरात अनेक स्फोट झाल्याच वृत्त आहे. स्फोटाचे आवाज दूर दूर पर्यंत ऐकू आले. लाहोरमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आल्यानंतर नागरिक घराच्या बाहेर एकत्र जमले आहेत. परिसरात दहशतीच वातावरण आहे.

गुरुवारी पाकिस्तानच्या लाहोर शहरात एका पाठोपाठ एक अनेक बॉम्ब स्फोट झाले. लाहोरच्या जुन्या विमानतळाजवळ हे स्फोट झाले. त्यानंतर लाहोर एअरपोर्ट बंद करण्यात आला. प्रत्यक्षदर्शींच म्हणणं आहे की, हा मिसाइल हल्ला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर हा दुसरा मोठा हल्ला मानला जातोय. किती जिवीतहानी झालीय ते अजून समोर आलेलं नाही. पण इमारतींच मोठ नुकसान झाल्याच फोटोंमधून दिसतय. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार दोन ते तीन स्फोट झाले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, हा हल्ला मिसाईलद्वारे करण्यात आला. या घटनेनंतर लाहोर एअरपोर्ट तात्काळ बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक उड्डाण प्रभावित झाली आहेत. प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय.

लाहोरमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आल्यानंतर नागरिक घराच्या बाहेर एकत्र जमले आहेत. परिसरात दहशतीच वातावरण आहे. पोलीस सूत्रांनुसार वॉल्टन एअरपोर्टजवळ ड्रोन बलास्ट झालाय. हा स्फोट ड्रोनमुळे झालाय. जॅमिंग सिस्टिममुळे हे ड्रोन पाडण्यात आलं असं तिथल्या पोलिसांच म्हणणं आहे. पाकिस्तानच्या समा टीव्हीच्या रिपोर्टनुसार, गुरुवारी सकाळी लाहोरच्या वॉल्टन रोडवर जोरदार स्फोटाचा आवाज ऐकू आला. वॉल्टर एअरपोर्टजवळ असलेल्या लाहोरच्या गोपाळ नगर आणि नसीराबाद भागात लागोपाठ ब्लास्ट झाले. सायरन वाजल्यानंतर लोक तात्काळ घराच्या बाहेर निघून आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!