भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

मुक्ताईनगर निवडणुकीत गुंडशाही व महिला सुरक्षेचा मुद्दा निर्णायक ठरणार ! 

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज चमू | राज्यभरात सध्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचा धुराळा उडताना दिसत आहेत. राज्यभरात सध्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचा धुराळा उडताना दिसत आहेत. या निवडणुकांना राज्यातील मातब्बर नेते राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये जावून सभा घेत आहेत. त्यात नेहमी प्रकाश जोतात असलेल्या मुक्ताईनगरमध्ये निवडणुकीला विशेष रंगत आलेली बघायला मिळत आहे. स्थानिक आमदार आणि मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

विशेष म्हणजे या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीत शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष बघायला मिळत आहे. यात गुंडशाही व महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून हा मुद्दा येथे निर्णायक ठरणार असल्यचे राजकीय जाणकार सांगत आहेत.

येथिल नेहमीच पूर्ण राज्यात चर्चेत ठरणारा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा निर्णायक भूमिकेत राहणार आहे. भाजपच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे व भाजप पक्षाकडून मुक्ताईनगरच्या जनतेने आम्हाला भरगोच मतानी निवडून द्यावे माता बघिनीच्या सुरक्षेच्या उपाय योजना आम्ही करू असे आश्वासन देत आहे. त्यामुळे मदारांना कौल हा कोणाला मिळणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल परंतु महिला सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार हे नक्की ?

मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाच्याशीर्ष नेतृत्वाने मोठी ताकद लावली असून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे व भाजपचे उमेदवार भावना ललित महाजन आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी अक्षरशः पायाला फिंगरी बांधली आहे. जोरदार प्रचार करताना उमेदवार पाहायला मिळत  आहे. या प्रचार आतापर्यंत भाजपच्या भावना ललित महाजन यांनी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. गुंडशाही रोखण्यासाठी व महिलांच्या संरक्षणासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना ललित महाजन यांनी सांगितले आहे. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!