भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव मध्ये संविधान दिवस साजरा – विद्यार्थ्यांमध्ये जागृतीचा संदेश

जळगाव,मंडे टु मंडे न्युज. कानडे सर | आज गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये संविधान दिवस उत्साहपूर्वक साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन प्रमुख पाहुणे गोदावरी फाउंडेशनचे संचालित गोदावरी लॉ कॉलेजचे प्राचार्य नयना झोपे, उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका स्मिता भोलाणे, गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य प्राचार्यां सौ. नीलिमा चौधरी च्या हस्ते करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन विविध भाषांमध्ये केले.इयत्ता ८ वी व ९वी च्या विद्यार्थ्यांनी संविधान, अधिकार व कर्तव्ये या विषयांवर आधारित देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. या यावेळी युवा संसद( युथ पार्लमेंट ) चे आयोजन करण्यात आले.शिक्षकांनीही संविधानाचे महत्त्व, लोकशाहीची जपणूक आणि नागरिक म्हणून आपली जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर, जागरूकता आणि कर्तव्यनिष्ठा निर्माण करण्याचा प्रयत्न यशस्वीपणे साध्य झाला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!