जैन मुनीं – शरद पवार भेटीत “तुम्ही शाकाहारी की मांसाहारी”? जैन मुनींच्या ‘या’ प्रश्नावर काय म्हणाले शरद पवार …
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जैन समाजाचे महाराज नुकतेच मध्यप्रदेशहून बारामतीत विहारात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जैन मुनींचे दर्शन घेतले. यावेळी युगेंद्र पवार देखील शरद पवारांसोबत हजर होते.
शरद पवार आणि जैनमुनींमध्ये जैन धर्माविषयी चर्चा झाली.
बारामतीतील महावीर भवन या ठिकाणी व्यापाऱ्यांचा मेळावा शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहेत. तत्पूर्वी महावीर भवनमध्ये आलेल्या विशालसागरजी महाराज, धवलसागरजी व उत्कृष्ट सागर महाराजांचे शरद पवारांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जैन धर्माविषयी महाराजांशी चर्चा केली.
पवार साहेब तुमचं शाकाहाराबद्दल मत काय ? तुम्ही शाकाहारी की मांसाहारी? जैन महाराजांचा प्रश्न
बारामतीत जैन मुनींनी शरद पवारांना विचारलं पवार साहेब तुमचं शाकाहारी बद्दल मत काय ? तुम्ही शाकाहारी की मांसाहारी? असा प्रश्न केला. यावर प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले, आजकाल मी शंभर टक्के शाकाहारी आहे. याआधी मी शाकाहारी नव्हतो. परंतु मागच्या एका वर्षांपासून मी पूर्णतः शाकाहारी आहे, असं शरद पवार यांनी सांगितले