एरंडोल

कासोद्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ,सेंट्रल बँकेत खातेदाराची तूफान गर्दी– प्रशासन सुस्त

कासोदा ता.एरंडोल (डॉ.ज्ञानेश्वर भोई)। कोरोनाने महाराष्ट्रात रुद्र रूप धारण केलेले असताना कासोदा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत  असून जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना संदर्भात काढलेल्या आदेशाला खातेदारांनी हरताळ फासल्याचे चित्र दिसत आहे.

जिल्हाधिकारी जळगाव यांचे आदेशाची पायमल्ली करत नाक तोंडावर माक्स न लावता ,सोशल डिस्टन्स चा नियम अक्षरश पायदळी तुडवला जात आहे कसोदा .ता.एरंडोल येथील  सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेत कुठलेही नियम न पळता नागरिकांची गर्दी  दिसून येत आहे या सर्व प्रकाराकडे शासकीय यंत्रणेचे तसेच बँक प्रशासनाचे पूर्णपणे  दुर्लक्ष होत असल्याने दिसून येत आहे.        

तसेच गावात   जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी गेले असता रिकामटेकड्या लोकांच्या गर्दीचा मोठा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे यातील 90 टक्के लोक आपल्या तोंडावर मुखपट्टी न लावता,सोशल डिस्टन न पाळता गर्दी करीत असतात या रोजच्या दैनंदिन गर्दीकडे स्थानिक प्रशासनाचे  अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.  संपूर्ण जिल्हयात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय यंत्रणेने कठोर निर्णय घेऊन दंडात्मक कारवाई किंवा गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी जेणे करून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!