क्राईमजळगावधरणगाव

खळबळजनक : तोंड दाबून ओढत नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। धरणगाव तालुक्यातील एका गावात रात्री घरातून उचलून नेऊन अल्पवयीन १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीला आली असून धरणगाव पोलीस ठाण्यात पिडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,धरणगाव तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय मुलगी, आई, बहिण आणि भावासोबत वास्तव्याला आहे. सहा वर्षांपुर्वी पीडित मुलीच्या वडीलांचे निधन झाले आहे. सोमवारी रात्री घरातील सर्वजण जेवण करून झोपले. पीडित मुलगीदेखील झोपली होती. रात्री ९ वाजता पिडीत मुलगी लघुशंकेसाठी उठली असता संशयित आरोपी योगेश दिनकर कोळी याने अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून ओढत नेत एका घरात तिच्यावर अत्याचार केला. रात्री १० वाजता पीडित मुलगी जागेवर नसल्याचे आईच्या लक्षात आल्यावर ती चितेंत होती.आईसह नातेवाईकांनी मुलीचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. मध्यरात्री १२.३० वाजता मुलगी घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. मंगळवारी सायंकाळी धरणगाव पोलीस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी योगेश दिनकर कोळी याच्यावर लैंगिक अत्याचार व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी फरार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!