भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

भुसावळचे आ. संजय सावकारे यांच्या मालकीची कार चक्क परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जिल्ह्यातील भुसावळ शहराचे आमदार संजय सावकारे यांच्या मालकीची टोयोटा कंपनीची कार चक्क परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर जळगाव आरटीओ कार्यालयातून परस्पर ट्रान्सफर करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वामन सावकारे यांच्याकडे टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. कंपनीची एमएच १९- सीझेड ५१३० क्रमांकाची कार आहे. ती याच नावाने २३ फेब्रुवारी २०२१ रोजी आरटीओत नोंदणी झालेली आहे. आता हीच कार २४ डिसेंबर २०११ रोजी अनिल दत्तात्रय परब (रा. रविकिरण को-ऑप. सोसा. बांद्रा ईस्ट, मुंबई) या नावाने ट्रान्सफर झाली आहे. सावकारे यांच्या वाहन ट्रान्सफर कागदपत्रांवर आरटीओ कार्यालयातील तीन लिपिक व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) यांच्या सह्या आहेत. तरीही खातरजमा झाली नाही. ही बाब गंभीरच आहे.

तीन लिपिक व आरटीओची सही
वाहन खरेदी, ट्रान्सफर करताना नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येतो. तो अपडेट केल्यानंतरच प्रक्रिया पूर्ण होते. सावकारेंना ओटीपी आला नसताना हा प्रकार घडला. त्याउपर सावकारे यांच्या वाहन ट्रान्सफर कागदपत्रांवर आरटीओ कार्यालयातील तीन लिपिक व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) यांच्या सह्या आहेत. या चारही जणांनी कुठलीही खातरजमा केलेली दिसून येत नाही.

मी कार विक्री किंवा ट्रान्सफर केलेली नाही. आता मी याच कारमधून चाळीसगाव-भुसावळ प्रवास करीत आहे, असं आमदार संजय सावकारे म्हणाले.

या प्रकाराची मी स्वतः चौकशी करीत आहे. प्रथमदर्शनी ही कार ट्रान्सफर झाल्याचे दिसत आहे, असे जळगाव आरटीओ अधिकारी श्याम लोही म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!