जळगाव जिल्ह्याला कोरोनाचा दिलासा,आज १५८ नवीन रुग्ण
Monday To Monday NewsNetwork।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १५८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ४९० रुग्णांगावनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – ०७, जळगाव ग्रामीण-०५, भुसावळ-१४, अमळनेर-०६, चोपडा-०२, पाचोरा-१६, भडगाव-०२, धरणगाव-०१, यावल-०८, एरंडोल-१९, जामनेर-०७, रावेर-०४, पारोळा-०२, चाळीसगाव-४७, मुक्ताईनगर-०२, बोदवड-१२, इतर जिल्ह्यातील-०४ असे एकुण १५८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १३९ हजार ९८५ पर्यंत पोहचली असून १३१ हजार ८७४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५३२ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ५५७९ रुग्ण सध्या उपचार घेताय.